धक्कादायक : नाशिकमधून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण

धक्कादायक : नाशिकमधून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण

प्रेम प्रकरणातून या मुली गेल्यात की त्यांना फूस लावून नेण्यात आलं याबाबत पोलिसांच्या तपासाची चक्र फिरत आहेत. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.

  • Share this:

नाशिक 2 ऑगस्ट : मुसळधार पावसाने नाशिकला फटका दिलेला असतानाच आणखी एका धक्कादायक घटनेनं शहरात खळबळ उडालीय. शहरात एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण झाल्याच्या तक्रारी मिळाल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. यातल्या दोन मुली या मैत्रिणी आहेत. शाळेत आणि क्लासेसला जातो असं सांगून या मैत्रिणी घराबाहेर पडल्या आणि पुन्हा घरी आल्याच नाहीत अशी माहिती मिळतेय. या सर्व घटनांचा पोलीस तपास करत आहेत.

भूमिपुत्रांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

गेल्या दोन दिवसांपासून या मुली घरातून बेपत्ता आहेत. क्लासेस आणि शाळेला जातो असं सांगून त्या घरातून बाहेर पडल्या आणि पुन्हा आल्याच नाहीत. या मुली कुठे मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेल्या असतील असं वाटून त्यांच्या कुटुंबीयांनी गेली दोन दिवस शोधाशोध केली. त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे विचारपूस केली मात्र कुठेच त्यांचा पत्ता लागला नाही त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

ED चौकशी होणार? राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

त्यांचे पालक जसे चौकशी करत होते तसं त्यांना वेगवेगळी माहितीही मिळत होती. त्यामुळे शेवटी पालकांनी नाशिकच्या अंबड आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. यातल्या दोन मैत्रिणींना फुस लावून पळविण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी विविध अंगांनी पोलीस तपास करत आहेत.

प्रेम प्रकरणातून या मुली गेल्यात की त्यांना फूस लावून नेण्यात आलं याबाबत पोलिसांच्या तपासाची चक्र फिरत आहेत. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. मुलींच्या शाळेत, नातेवाईकांकडे आणि मित्र मैत्रिणींकडे पोलीस तपास करत असून काही धागेदोरे मिळाले असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 2, 2019, 3:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading