मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुळ्यात सामूहिक आत्महत्येने खळबळ; एकाच कुटुंबातील तिघांची नदीत उडी मारुन आत्महत्या

धुळ्यात सामूहिक आत्महत्येने खळबळ; एकाच कुटुंबातील तिघांची नदीत उडी मारुन आत्महत्या

Mass Suicide in Dhule: धुळ्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Mass Suicide in Dhule: धुळ्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Mass Suicide in Dhule: धुळ्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

धुळे, 19 मे: उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात (Dhule District) एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या (Mass suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरून (Tapi river bridge) या कुटुंबाने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावात राहणारे राजेंद्र रायभान देसले यांनी आपली पत्नी आणि मुलीसह नदीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. धरणगाव-एरंडोल तालुका शेतकरी संघाचे ते संचालक असल्याची माहिती समोर येत आहे. राजेंद्र रायबन पाटील (51) हे आपली पत्नी वंदना राजेंद्र पाटील आणि मुलगी ज्ञानल सोबत अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.

Building Collapsed: पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, पाहा LIVE VIDEO

कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे कुटुंब आपल्या कारने भोद येथे जाण्यासाठी निघाले होते मात्र, काही वेळात त्यांचा मोबाइल क्रमांक बंद झाला. नातेवाईकांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला मात्र, फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 17 मे रोजी त्यांची कार तापी नदीजवळ आढळून आली. यानंतर नदीपात्रात शोधाशोध सुरू करण्यास सुरूवात झाली.

याच दरम्यान राजेंद्र रायबन पाटील (51) हे आपली पत्नी वंदना राजेंद्र पाटील आणि मुलगी ज्ञानल या तिघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांनी आत्महत्या का केली? या मागचं अद्याप कारण समजू शकलेलं नाहीये. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Dhule, Suicide