बँक घोटाळा! पुण्यात भाजपशी घरोबा केलेल्या आमदाराच्या 3 आलिशान गाड्या जप्त

बँक घोटाळा! पुण्यात भाजपशी घरोबा केलेल्या आमदाराच्या 3 आलिशान गाड्या जप्त

पुण्यातील बहुचर्चित शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • Share this:

पुणे, 26 सप्टेंबर: पुण्यातील बहुचर्चित शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्या तीन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या गाड्यांच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. या तिन्ही गाड्यांची किंमत अंदाजे 1 कोटी 40 लाख आहे तर हा बँक घोटाळा 72 कोटींच्या घरात आहे. आमदार अनिल भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले असले तरी तीन वर्षांपासून त्यांनी भाजपशी घरोबा केला आहे.

हेही वाचा...एकनाथ खडसेंना भाजपनं पुन्हा डावललं; आता वेट करणार की वेगळी वाट निवडणार?

आमदार अनिल भोसले सध्या या घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह 11 जणांविरोधात ठेवीदारांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या प्रकरणी संबधीतावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर रिझर्व्ह बँकेकडून 2018/19 या वर्षाचे ऑडिट केले. त्यामध्ये तब्बल 71 कोटी 78 घोटाळा झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर बँकेचे व्यवहाराची सर्व बाजूने चौकशी करून आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक केली होती.

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच संचालक मंडळ मागेच बरखास्त करण्यात आलं असून रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नेमणुक शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच कामकाज पाहण्यासाठी केलीय. बॅंकेत हजारो ठेवीदारांचे जवळपास 300 कोटी रुपये अडकले आहेत.

हेही वाचा...पुणे जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली महिला सापडली पिरंगुटच्या घाटात!

दरम्यान, या आधी PNB बँकेतल्या घोटाळ्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेनं लाखोंच्या कर्जाचं अमिष दाखवून गरजू खातेदारांना तब्बल 7 कोटींना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येतात पीडित गुंतवणूकदारांनी पुण्यातलं या बँकेचं कार्यालयच फोडलंय. पुण्याच्या केके मार्केट संकुलातलं चंदगड अर्बन निधी बँकेचं ऑफिस सध्या बंद आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 26, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या