मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, कार पुलावरून कोसळून 3 ठार

धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, कार पुलावरून कोसळून 3 ठार

15 दिवसांपूर्वी याच स्पॉट झाला होता बसचा भीषण अपघात..

15 दिवसांपूर्वी याच स्पॉट झाला होता बसचा भीषण अपघात..

15 दिवसांपूर्वी याच स्पॉट झाला होता बसचा भीषण अपघात..

  • Published by:  Sandip Parolekar

निलेश पवार, (प्रतिनिधी)

नंदूरबार,12 नोव्हेंबर: मृत्यूचा सापळा झालेल्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात शुक्रवारी पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली कोसळून तीन जण जागेवरच ठार झाले असून दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृत आणि जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही. स्थानिक पोलीस आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

हेही वाचा..शरद पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर पहिल्यांदा फडकले काळे झेंडे!

मिळालेली माहिती अशी की, धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात कंटेनर आणि स्वीफ्ट गाडीचा अपघात झाल्यानंतर पुलावरुन ती खोल दरीत कोसळली. विशेष म्हणजे गेल्या 21 ऑक्टोंबरला याच पुलावरुन खासगी बस कोसळून भीषण अपघात झाला होता. त्यात 5 जण मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच जागेवर त्याच पद्धतीनं अपघात झाल्यानं वाहनधारकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

या अपघातात 3 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर 15 वर्षीय युवती गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्त कारमधील प्रवाशी राजकोटहून धुळे जिल्ह्यातल्या महिर  गावाकडे जात होते.

कोंडाईबारी घाटात महिन्याभरात ही दुसरी भीषण दुर्घटना आहे. या आधी खासगी बस या पुलावरून कोसळली होती. ही घटना ताजी असताना आता याच घाटात चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सदर गाडी सुरतहुन धुळ्याच्या दिशेनं येत होती. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

15 दिवसांपूर्वी याच स्पॉट झाला होता बसचा भीषण अपघात..

धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. प्रवाशी साखर झोपेत असताना कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून जात असताना 30 ते 40 फूट खोल दरीत ही खासगी बस कोसळली होती. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान,  सदर अपघाताविषयी माहिती मिळताच पोलीस आणि बचावदलानं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. 35 जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जळगावहून सुरतच्या दिशेनं ही बस जात असताना हा भीषण अपघात झाला होता.

First published: