चंद्रपूरमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू

तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या गावकऱ्यांवर अस्वलाने हा हल्ला केला.

  • Share this:

13 मे : चंद्रपूरमध्ये अस्वलाच्या हल्लयात 3 जणांचा मृत्यू झालाय. तर चार जण गंभीररित्या जखमी झालेत. तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या गावकऱ्यांवर अस्वलाने हा हल्ला केला.

मौजा किटाळी तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे तेंदुपत्ता तोडण्यासाठी हे गावकरी गेले होते. यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी  वनविभागाला या अस्वलाला ठार मारायला सांगितलं. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर त्याला ठार मारलं.

तर गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात एका शेतक-याचा मृत्यू झालाय आरमोरी तालुक्यात अरसोडा रवी गावातील शेतात असलेल्या वामन मरप्पा या शेतकऱ्यावर हल्ला केला. या भागात एका महिन्यात वाघाने हल्ला केल्याची ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 06:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading