लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)
नाशिक, 18 जुलै: नाशिक शहरातसुट्टीची मज्जा तीन मित्रांच्या जीवावर बेतली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रापैकी तिघांचा धरणाच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरणात शनिवारी ही घटना घडली आहे. योगेश बागुल, महेश लांडगे आणि वैभव पवार असं मृत तरुणांची नावं आहेत. सगळे नाशिक शहरातील नवीन नाशिक भागातील रहिवाशी असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा...धुळ्यात घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
धरणावर फिरायला गेल्यावर चारही मित्रांना पोहयलाचा मोह आवरता आला नाही. पाण्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. हे तिघेही युवक सिडकोतील आहे. एक जण पाण्यात न उतरल्याने तो बचावला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी मंगेश बाळासाहेब बागुल (वय-32, रा.पाथर्डी फाटा), महेश रमेश लाळगे (वय 32, रा.महाकाली चौक) , वैभव नाना पवार (वय-27, रा.उत्तम नगर) आणि गणेश एकनाथ जाधव हे चौघे मित्र वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेले होते.
मंगेश, महेश व वैभव हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. हे पाहून पाण्यात न उतरलेल्या गणेश याने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर पोहचलेल्या नागरिकांनी तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढलं. मात्र, तत्पूर्वीच तिघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेनंतर वाडी वऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे सिडको परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा...रेखाजींनी कोरोना चाचणी करून घ्यावी - मुंबईच्या महापौरांचं आवाहन
मंगेश बागूल हा मुंबई पोलिस कर्मचारी होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहीण, आई वडील आहेत. महेश लाळगे हा खासगी नोकरी करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक भाऊ,आई, वडील असा परिवार आहे. तर वैभव पवार इंजिनिअर असून तो एकूलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात बहीण, आई वडील असा परिवार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.