भाऊबीज करून येताना कुटुंबाचा भीषण अपघात, 2 मुलं झाली पोरकी

भाऊबीज करून येताना कुटुंबाचा भीषण अपघात, 2 मुलं झाली पोरकी

अपघातात पती-पत्नी आणि मुलगा या मुख्यदल कुटुंबातील तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Share this:

बुलडाणा, 12 नोव्हेंबर : भाऊबीज आटपून आपल्या घरी परतत असलेल्या कुटुंबाचा अपघात झाला आहे. देऊळगावराजा-चिखली मार्गावर कुंभारी इथं झालेल्या अपघातात पती-पत्नीसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुख्यदल असं आडनाव असलेलं कुटुंब भाऊबीज साजरी करण्यासाठी शेजारच्या गावाला गेलं होतं. तिथे भाऊबिजेचा कार्यक्रम आटपून मुख्यदल पती-पत्नी काल संध्याकाळी (रविवार) आपल्या लहान मुलासह मोटरसायकलवरून घरी परतत होते. तेव्हा कुंभारी इथं मुख्यदल यांच्या मोटारसायकलला चार चाकी मेटॅडोर वाहनानं जोरदार धडक दिली.

यामुळे झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार मुख्यदल कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातात पती-पत्नी आणि मुलगा या मुख्यदल कुटुंबातील तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यदल यांना अजून दोन मुलं आहेत. अपघातात आईवडील गेल्याने मुख्यदल कुटुंबातील ही दोन चिमुकली पोरकी झाली आहेत.

मुख्यदल कुटुंब मूळचं उमरखेड या गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उमरखेड गावावर शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मोटारसायकलला धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या ड्रायव्हरचा पोलीस आता शोध घेत आहेत.

VIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

First published: November 12, 2018, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading