नदीत उडी टाकून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न, मायलेकी बुडाल्या

नदीत उडी टाकून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न, मायलेकी बुडाल्या

हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका इथल्या पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरून एकाच कुटुंबातील तिघांनी पाण्यात उड्या टाकल्या.

  • Share this:

हिंगोली, 22 नोव्हेंबर : एकाच कुटुंबातील तिघांनी पाठोपाठ पाण्यात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आई आणि मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. तर गावकऱ्यांनी पाण्यात उडी टाकून बाहेर काढल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणारा पुरुष वाचला आहे.

विठ्ठल नायक यांची पत्नी शकुंतला नायक आणि मुलगी उमा देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी पत्नी शकुंतला आणि मुलगी उमा यांचा बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर स्थानिकांनी वेळीच बाहेर काढल्याने विठ्ठल नायक यांचा जीव वाचला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका इथल्या पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरून एकाच कुटुंबातील तिघांनी पाण्यात उड्या टाकल्या. बाजूला असणाऱ्या गावकऱ्यांनी हे पाहिले आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना वाचवण्यासाठी नदीत उड्या टाकल्या. परंतु पाण्यातून बाहेर काढेपर्यंत मायलेकींचा बुडून मृत्यू झाला होता. सुदैवाने विठ्ठल नायक या पुरुषाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आल आहे.

दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणारे हे तिघेही सेनगाव तालुक्यातील सवना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. घरगुती वादातून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे.

एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच या तिघांनी नक्की कोणत्या कारणामुळे स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

VIDEO: फ्लाईट हुकली म्हणून महिलेने रनवेवर केला विमानाचा पाठलाग

First published: November 22, 2018, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading