ट्रक-कारचा भीषण अपघात; तीन जागीच ठार तर एक गंभीर

ट्रक-कारचा भीषण अपघात; तीन जागीच ठार तर एक गंभीर

ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. चोपडा-शिरपूर मार्गावर आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी )

चोपडा, 12, मे- ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. चोपडा-शिरपूर मार्गावर आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

नामदेव गुलाबराव कोळी (वय-36, रा. मांजरोद, ता. शिरपूर), अनिल दशरथ जाधव(वय- 22, रा.बभळाज, ता.शिरपूर), किशोर गजानन बिऱ्हाडे (वय- 35, रा.भाटपुरा, ता.शिरपूर) अशी मयतांची नावे आहेत. गंभीर जखमीला उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

सदर अपघात चोपडा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर अकुलखेडा आणि काजीपुरा फाट्यादरम्यान झाला आहे.

SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

First published: May 12, 2019, 3:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading