रायचंद शिंदे (प्रतिनिधी)
शिरूर, 29 एप्रिल- शिरूर तालुक्यातील अमदाबाद गावात भिल्ल वस्तीतील एका झोपडीला भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे.
लाला आनंद गावड(वय- 34), दादा लाला गावडे (वय- 4) व प्रांजल अरुण पवार (वय- 3) अशी मृतांची नावे आहे. आग एवढी भीषण होती की, तिन्ही मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला आहे.
भरउन्हात आग लागली. त्यात आज शिरूर लोकसभा मतदार संघात मतदान होते. त्यामुळे आगीची दुर्घटना कळण्यास उशीर झाला. मदतीअभावी आगीत तिघांचा होरपळून मृत्यु झाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून राज्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतितापमानामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबईतील बिग बाजारच्या आगीचा पहिला VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Major fire, Pune, Shirur, Three Died