टायर फुटून कारने घेतला पेट, आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर

टायर फुटून कारने घेतला पेट, आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर

पुणे येथून चार तरुण यात्रेनिमित्त तलमोड येथे आले होते. त्यांच्या धावत्या कारचे पुढील टायर फुटून कारला भीषण आग लागली. नंतर गॅसचा स्फोट झाला. कार रस्त्याच्या कडेला उलटली. या आगीत चौघे होरपळले गेले.

  • Share this:

बालाजी निरफळ (प्रतिनिधी)

उस्मानाबाद, 21 एप्रिल- टायर फुटून रस्त्याच्या कडेला उलटलेल्या कारला भीषण आग लागली. या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड येथे रविवारी ही घटना घडली. आग एवढी भीषण होती की, कार क्षणात जळून खाक झाली.

मिळालेली महिती अशी की, पुणे येथून चार तरुण यात्रेनिमित्त तलमोड येथे आले होते. त्यांच्या धावत्या कारचे पुढील टायर फुटून कारला भीषण आग लागली. नंतर गॅसचा स्फोट झाला. कार रस्त्याच्या कडेला उलटली. या आगीत चौघे होरपळले गेले. त्यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, त्यापैकी तिघांना डॉक्टरांना मृत घोषित केले.एकाचा प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

First published: April 21, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading