विहिरीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मृतात बाप लेकांचा समावेश

विहिरीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मृतात बाप लेकांचा समावेश

औसा तालुक्यातील आलमला गावात विहिरीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाळ काढण्यासाठी विहिरित उतरलेल्या तिघांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

नितीन बनसोडे (प्रतिनिती)

लातूर, 29 एप्रिल- औसा तालुक्यातील आलमला गावात विहिरीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाळ काढण्यासाठी विहिरित उतरलेल्या तिघांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत इतर दोघे जखमी झाले आहेत.

लातूर जिल्हा सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जात आहे. याचा वाईट अनुभव औसा तालुक्यातील आलमला गावच्या ग्रामस्थांना आला. महीशंकर खिचडे यांच्या विहिरीतून पाण्याचा वापर आलमल्याचे ग्रामस्थ करत आहेत. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फारुक मुलाणी, सद्दाम फारूक मुलाणी, सईद मुलाणी, सुशांत बिराजदार, योगेश हुरदुळे व शाहिद मुलाणी हे सहा जण विहिरीत गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले. पण विहिरीच्या तळाला ऑक्सिजन न मिळाल्याने तिघांचा गुदमरुन मृत्यु झाला. यात फारुक मुलाणी, सद्दाम फारूक मुलाणी, सईद मुलाणी या तीन बाप लेकांचा मृत्यू झाला. तर सुशांत बिराजदार, योगेश हुरदुळे व शाहिद मुलाणी हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

First Published: Apr 29, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading