धुळे, 28 ऑक्टोबर : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात (accident on Mumbai Agra Highway) झाला आहे. सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे काही फोटोज समोर आले आहेत त्यावरुन हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. अपघातात एका कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं दिसत आहे. (7-8 vehicle crashed into each other on Mumbai Agra highway, killed 3)
धुळे (Dhule) जिल्ह्यातील बिजासनी घाट ते पळासने याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतरही काही जखमी झाले आहेत. अपघातात गाड्या एकमेकांवर आदळळ्याने जखमींना गाडीतून बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
Maharashtra | Three people died and one severely injured after 7-8 vehicles crashed into each other in Dhule on Wednesday, said police (27.10) pic.twitter.com/jSx9v6Iprw
— ANI (@ANI) October 28, 2021
वाचा : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात
दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात 3 वाहनांचा विचित्र अपघात
26 ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली खामगाव मार्गावरील वैरागड येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला होता. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित सातही जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात वैरागड गावाजवळील एका छोट्या घाटात झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो गाड्या सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात होत्या. तर महावितरण कंपनीची सुमो कार खामगावकडून चिखलीच्या दिशेने जात होती. दरम्यान वैरागड गावाजवळील मोहाडी घाटात संबंधित तीन वाहनांना भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये महावितरणाच्या सुमो कारचा चुराडा झाला असून गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित सातही गंभीर जखमी रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.