'मृत्यूचा मेन्यू' चायनीज दुकानावर झाला वाद, तरुणाला डोक्यात रॉड घालून जागीच केलं ठार!

'मृत्यूचा मेन्यू' चायनीज दुकानावर झाला वाद, तरुणाला डोक्यात रॉड घालून जागीच केलं ठार!

जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मेकोसाबाग लुम्बिनीनगर वस्तीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणावर रॉडने हल्ला करत त्याला मारून टाकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 29 सप्टेंबर : शुल्लक कारणावरून मित्रांच्या झालेल्या वादात गुन्हा घडल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. एका 25 वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मेकोसाबाग लुम्बिनीनगर वस्तीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणावर रॉडने हल्ला करत त्याला मारून टाकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.

रिषभ उर्फ दद्दु हेमंत माथनेन असं मृत तरुणाचं नाव आहे. तो अमबिनीनगरमधला रहिवासी आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास रिषभवर 3 जणांनी डोक्यावर रॉडने हल्ला करून हत्या केली. या हल्ल्यामध्ये रिषभ जागीच ठार झाला. त्याच्या अशा जाण्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक रिषभ हा मेकोसबाग परिसरातील चायनीजचा ठेला चालवायचा. याच ठेल्यावर झालेल्या भांडणातून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांआधी रिशभची आरोपी मुलांसोबत शुल्लक कारणावरून भांडणं झाली होती. भांडणाच्या दिवसापासून आरोपींचा रिषभवर राग होता. शनिवारी रात्री त्यांनी रिषभला गाठलं आणि त्याच्यावर लोखंडी रॉडने वार केले. डोक्यात जोरात रॉड लागल्यामुळे रिषभचा जागीच मृत्यू झाला. रिषभ मेल्याचं समजताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

इतर बातम्या - समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू

स्थानिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी जखमी रिषभला उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - VIDEO: PM मोदींचं वक्तव्य भिडे गुरूजींनी ठरवलं चुकीचं, पुन्हा नवा वाद?

दरम्यान, रिषभच्या अशा जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण परिसरातून आणि रिषभच्या मित्रांमधून यावर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. रिषभची निर्घृण हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून  करण्यात आली आहे.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

Published by: Renuka Dhaybar
First published: September 29, 2019, 1:24 PM IST
Tags: murder

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading