बीड, 08 जून : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच घरातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना परळी तालुक्यातील शिवारात घडली. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
परळी तालुक्यातील दाऊतपूर औष्णिक विद्युत केंद्राजवळ खदानीत पाणी साठलेले आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी याच परिसरात दगडफोड करणाऱ्या मजूर कुटुंबातील एक 15 वर्षीय मुलगी खदानीमध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान बहीण व भाऊही होता.
हेही वाचा -महाराष्ट्र घेणार ऐतिहासिक निर्णय, परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत चर्चा सुरू
बराच वेळ झाल्यामुळे मुलं परत न आल्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी खदानीमध्ये जाऊन पाहिले असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
कुटुंबातील सदस्यांनी जीवाच्या आकांताने खदानीकडे धाव घेतली आणि तिन्ही लेकरांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने परिसरात कुटुंबीयांनी एक आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहे.
हेही वाचा -उपराजधानी पुन्हा हादरली, भर बाजारात कुख्यात गुंड बाल्या वंजारीला संपवलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.