पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा सिल्लोड इथे पाण्यात बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा सिल्लोड इथे पाण्यात बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सिल्लोड शहरात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 27 जून- पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सिल्लोड शहरात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली आहे.

सिल्लोड शहरासह तालुक्यात सर्वदूर काल दमदार पाऊस झाला. या पावसामुळे सिल्लोड शहरातील यशवंत नगर मोहमदिया कॉलनी परीसरातील वस्तीला लागून काही अंतरावर असलेल्या नाला ओढ्यातील शिवडीत पाणी जमा झाले आहे. याच पाण्यात वस्तीतील तिघेजण पोहायला गेले होते. तिघांपैकी एकही पोहण्यात तरबेज नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.अबरारखा मुश्ताखखा पठाण (वय-11), अनसखा अमजदखा (वय-14), मोइन हारून शाह (वय-12, तिघेही राहणार यशवंत नगर मोहमदीया कॉलनी, सिल्लोड) अशी मृत मुलांची नावे आहेत.

बिहारमधून महाराष्ट्रात मुलांची तस्करी..

बिहारमधून महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी येतात हे आता काही नवं राहिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंडमधली लोकं आता स्थिरावली आहेत. मात्र रेल्वे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत धक्कादायक खुलासा झालाय. महाराष्ट्रात मजुरीसाठी आणल्या जाणाऱ्या 33 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.

छत्तीसगडच्या राजनंदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. हावड्यावरून मुंबईला जाणाऱ्या गाडीत संशयास्पद मुलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गाडीत S-5 आणि S-7 या डब्ब्यांमध्ये अशी मुलं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या डब्यांमध्ये तपासणी केली. तेव्हा त्यांना ही मुलं आढळली. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या एका वकिलाने ही माहिती पोलिसांना कळवली होती.

ही सर्व मुले 7 ते 13 या वयोगटातली आहेत. या सर्व मुलांना मदरशांमध्ये घेऊन जात असल्याचं या मुलांसोबत असलेल्या आरोपीने सांगितलं. मात्र त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रं नव्हती. या मुलांना नंदूरबारमध्ये घेऊन जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. या मुलांसोबत तीन मोठ्या व्यक्ती होत्या त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर मुलांना सुधारगृहात पाठविण्यात आलंय. छत्तीसगड पोलीस बिहार पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाचा तपास करत आहेत.

टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

First published: June 27, 2019, 7:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading