Home /News /maharashtra /

लग्नाचा आनंद क्षणात वाहून गेला; कार्यक्रमासाठी लातुरात आलेल्या तिघांचा बुडून दुर्दैवी अंत

लग्नाचा आनंद क्षणात वाहून गेला; कार्यक्रमासाठी लातुरात आलेल्या तिघांचा बुडून दुर्दैवी अंत

शुक्रवारी लाळी खु. येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह (Marriage) होता. यासाठी चिमेगा येथील बंडू तेलंगे आणि राजा दापका येथील हनुमंत तेलंगे यांचे कुटुंबीय आले होते.

  लातूर, 28 मे : लातूर (Latur) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका ठिकाणी विवाह समारंभासाठी तीन मुले आली होती. त्यांना पोहण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात उतरली होती. तेव्हा लहान भाऊ बुडत असल्याचे पाहून मोठ्या भावाने आणि आणखी एकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी धक्कादायक घटना घडली. नेमका काय घडलं - शुक्रवारी लाळी खु. येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह (Marriage) होता. यासाठी चिमेगा येथील बंडू तेलंगे आणि राजा दापका येथील हनुमंत तेलंगे यांचे कुटुंबीय आले होते. गावातील विष्णुकांत तेलंगे (वय 18) आणि एकनाथ तेलंगे, संगमेश्वर तेलंगे आणि त्याचा सख्खा भाऊ श्याम उर्फ चिमा तेलंगे हे चार जण शुक्रवारी सकाळीच्या सुमारासल गावाजवळील तीरु नदीवरील कोल्हापुरी बंधारा येथे पोहण्यासाठी (Swimming) गेले होते. आंघोळीसाठी उतलेल्यापैकी एकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघे जणही पाण्यात उतरले. तिघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. शेवटी तिघांचाही बुडून मृत्यू (Death) झाला. तर यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी खोल होते. म्हणून स्थानिकांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. हेही वाचा - हिंगोली हादरलं! उंदीर मारण्याचं औषध खाऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  यानंतर या घटनेची माहिती तहसीलदार सुरेखा स्वामी यांना देण्यात आली. त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. संगमेश्वर बंडू तेलंगे (वय 13), चिमा बंडू तेलंगे (वय 15) व एकनाथ हनुमंत तेलंगे (वय 15) अशी मृत मुलांची नावे आहेत. संगमेश्वर व चिमा हे दोघे सख्खे भाऊ कर्नाटकातील कमालनगर तालुक्यातील चिमेगाव येथील, तर एकनाथ हा उदगीर तालुक्यातील निडेबन येथील रहिवासी होता. या घटनेमुळे तेलंगे परिवारातील विवाहावर व लाळी खर्द गावावर शोककळा पसरली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Death, Latur

  पुढील बातम्या