PAK vs AFG क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अकोल्यात अटक

PAK vs AFG क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अकोल्यात अटक

विश्वचषकातील पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अकोल्यातील खदान पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

अकोला, 29 जून- विश्वचषकातील पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अकोल्यातील खदान पोलिसांनी अटक केली आहे. अकोला शहरातील आदर्श कॉलनी येथील आहुजा अपार्टमेंटमध्ये क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून खदान पोलिसांनी आहुजा अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. या अपार्टमेंटमधून सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, सहा मोबाइल, टीव्ही, सेटटॉप बॉक्स जप्त केला आहे.

Eng vs Aus सामन्यावर सट्टा लावणाऱ्या PSI च्या हातात बेड्या

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) रंगेहात अटक करण्यात आली होती. दादर पोलिसांनी ही कारवाई केली होती. ज्ञानेश्वर खरमाटे असे आरोपी पीएसआयचे नाव असून त्याच्यासह दोघांना पोलिसांनी दादरमधील एका हॉटेलमधून अटक केली.

ज्ञानेश्वर खरमाटे हा भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. या कारवाईनंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे.

मिकीन शहा नावाचा व्यक्ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने दादरमधील एका हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना आढळून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील तिथेच होता. मिकीन शहा आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे याला अटक करण्यात आली. आरोपींकडून 1 लाख 93 हजार 200 रुपये रोख आणि सहा मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : पुण्यातली भिंत पडली तेव्हा काय घडलं प्रत्यक्ष? CCTV फुटेज आलं समोर

First published: June 29, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading