मुंबई, 11 जून- माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी वेगवेगळ्या दिवशी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये गुहागर बस डेपोचा वॉचमनचा समावेश आहे. निलेश चव्हाण, निखील पिल्ले, आणि धीरज देवकर अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे गुहागरसह परिसरात खळबळ उडाली आहे.
आई-वडील कामावर, घरी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
आई-वडील कामावर गेले असताना घरी असलेल्या त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना नागपुरमध्ये घडली असून चिमुकलीवर बलात्कार करणारा 25 वर्षीय आरोपी फरार झाला आहे.
नागपूरच्या वाडी भागात साडेतीन वर्षांची मुलगी घरी ठेवून दाम्पत्य कामावर गेलं होतं. आई-वडील कामावर गेले असल्याने साडेतीन वर्षाची लहानगी शेजारी असणाऱ्या लहान मुलांसोबत खेळण्यात दंग होती. त्यानंतर तिथं आलेल्या भूषण दहाट या आरोपीने त्या चिमुकलीला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
Facebookवर ‘भीक’ मागून महिलेनं 17 दिवसात कमावले 35 लाख!
अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर वाडी परिसरात संतापाची लाट पसरली आहे. चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर 25 वर्षीय आरोपी भूषण दहाट हा तिथून फरार झाला. दरम्यान, या घटनेबाबत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी की देवेंद्र फडणवीस? अण्णा हजारेंना 'या' नेत्याचं आवडतं काम
सुमित राघवनच्या संतापानंतर मनपाच्या हालचाली, नाट्यगृहात जॅमर बसवणार?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rape case