BREAKING: उद्धव ठाकरे यांचा 'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

BREAKING: उद्धव ठाकरे यांचा 'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केल्याची माहिती मिळाली आहे. 'दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकू', अशी धमकी दिली होती.

हेही वाचा...उदयनराजेंच्या 'त्या' वक्तव्यावरून बंजारा समाजाच्या नेत्यानं केली जहरी टीका

या आधी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांनी मोठी कारवाई केली होती. मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. नायक यांनी कोलकातामधून आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. 'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी 30 ऑगस्टला आली होती. त्यानंतर 'वर्षा' बंगला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. आता तर आधी आकाशवाणी आमदार निवास उडवून देण्याची मुंबई पोलिसांना मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील फार्म हाऊसची काही अज्ञातांनी रेकी केली होती.

दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन करण्यात आले होते. त्यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली.

हेही वाचा...दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत, शरद पवारांनी लगावला सणसणीत टोला

त्यानंतर रायगडमधील खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाउसवर टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली होती. फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस करण्यात आली होती. याप्रकरणी मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर रेकी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: September 29, 2020, 7:47 PM IST

ताज्या बातम्या