महापुराने पुणे -बंगळूरू हायवे बंद; हजारो ट्रक अडकले, लाखोंचा माल धोक्यात

अतिवृष्टीमुळ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दोन दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 07:38 PM IST

महापुराने पुणे -बंगळूरू हायवे बंद; हजारो ट्रक अडकले, लाखोंचा माल धोक्यात

सातारा 6 ऑगस्ट :   मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे पुणे कोल्हापूर बंगळूरू हा हायवे बंद झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झालाय. त्यामुळे दोन्ही बाजून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात हजारो ट्रक अडकले आहेत. हा हायवे कायम अतिशय व्यस्त असतो. दररोज हजारो ट्रक्स या मार्गावरून ये जा करतात. तर यातून कोट्यवधींच्या मालाची वाहतूक होत असते. या अनेक ट्रक्समध्ये नाशवंत माल असल्याने पाणी कमी झालं नाही तर हा माल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात 7-8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज

आकाशातून कोसळणारा पाऊस, धरणांमधून सोडलं जाणारं पाणी यामुळे  नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलीय. त्याचबरोबर नाले आणि ओढ्यांमधूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यानं हा सगळा परिसर जलमय झालाय.

गोकूळचं दूध संकलन दोन दिवस बंद

अतिवृष्टीमुळ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दूध संकलन (आज व उद्या सकाळी) बंद करण्याचा निर्णय घेतलाय. संकलित झालेलं दूध वितरण करण्यात मोठ्या अडचणी येत असून त्यामुळे दूध संकलन बंद करण्यात आलंय. त्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि गोवावासियांना  दूध टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Loading...

मुसळधार: राधानगरीत अडकले गोव्याचे 150 प्रवासी, बचाव कार्य सुरू

गोकुळचं दररोज साधारण ९ लाख ५० हजार लिटर दूध संकलन असून वितरण ११ ते ११.५ लाख लिटरपर्यंत आहे. सकाळच्या ५ लाख लिटर संकलनापैकी आज सकाळी २ लाख ३२ हजार लिटर दूध संकलन झालंय. दररोज वितरणासाठी लागणारे दूध तसेच शिल्लक असल्याने दररोज होणाऱ्या दूध संकलनाने त्यावर आणखी विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...