VIDEO: कसा जाईल कोरोना? सोलापुरात काँग्रेस नेत्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी, पोलिसांना घ्यावी लागली बघ्याची भूमिका

VIDEO: कसा जाईल कोरोना? सोलापुरात काँग्रेस नेत्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी, पोलिसांना घ्यावी लागली बघ्याची भूमिका

solapur for rites crowd काँग्रेस नेते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्ययात्रेत ही गर्दी पाहायला मिळाली. गर्दी एवढी जास्त होती की पोलिसांना काहीही करता आलं नाही, त्यामुळं त्यांनाही बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

  • Share this:

सोलापूर, 16 मे : राज्यावर ओढावलेलं कोरोनाचं संकट (Coronavirus) पाहता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) कसोशीनं प्रयत्न करत आहे. अधिकाधिक कठोर निर्बंध लावत सरकारनं आता लॉकडाऊन (Lockdown) आणखी वाढवला आहे. 1 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन आहे. मात्र असं असतानाही काही बेजबाबदार नागरिकामुळं कोरोनाचा राक्षस आणखी फोफावत आहे. रविवारी सोलापुरात असाच एक प्रकार पाहायला मिळला.

(वाचा-लसीमुळे कोरोनापासून 97.38 टक्के मिळतंय संरक्षण, प्रकृती बिघडण्याची शक्यताही कमी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळे, विवाह, कार्यक्रम आणि अंत्यविधीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. अंत्यविधीसाठी अत्यंत मोजक्या लोकांना तीही पोलिसांची परवानही असेल तरच उपस्थितीची मान्यता मिळते. मात्र सोलापुरात कोरोनाच्या सगळ्या नियमांना हरताळ फासत काँग्रेसच्या एका नेत्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी जमल्याचं चित्र पाहायला मिळालं. काँग्रेस नेते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्ययात्रेत ही गर्दी पाहायला मिळाली. गर्दी एवढी जास्त होती की पोलिसांना काहीही करता आलं नाही, त्यामुळं त्यांनाही बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

सोलापुरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून करण म्हेत्रे यांची ओळख होती. तसंच सोलापुरात ताडीवर बंदी आणण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केला होता. अशाच कामामुळं त्यांना जनमाणसातही आदराचं स्थान होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते सावरले मात्र त्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाल्यानं, कोरोनाच्या लढ्याला यामुळं धक्का बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

(वाचा-शुल्लक कारणावरुन कुटुंबातील 4 जणांवर चाकू हल्ला; LIVE VIDEO आला समोर)

याठिकाणी जमलेल्या लोकांनी गर्दी तर केलीच पण मास्क किंवा कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले इतर नियमही पाळले गेले नसल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वीही काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम तसेच लग्न सोहळे अथवा अंत्ययात्रा यातून कोरोनाचा मोठा संसर्ग पसरल्याचं पाहायला मिळालं आहे. आता या प्रकारानंतर सोलापूरमध्येही पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या तर वाढणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 16, 2021, 6:07 PM IST

ताज्या बातम्या