मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कोरोना'च्या नावाखाली हजारो कोंबड्यांचा घेतला जीव, अखेर पोलिसात गुन्हा दाखल

'कोरोना'च्या नावाखाली हजारो कोंबड्यांचा घेतला जीव, अखेर पोलिसात गुन्हा दाखल

 संपूर्ण जगात कोरोनाची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपूर्ण जगात कोरोनाची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपूर्ण जगात कोरोनाची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

  • Published by:  sachin Salve

कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधी

हिंगोली, 19 मार्च : 'सोन्याचं अंडे देणारी कोंबडी' गोष्ट आपण लहाणपणी ऐकली असेल. पण, हिंगोलीत एका पोल्ट्रीचालकाने 'सोन्याचं अंड' अर्थात शासनाचा निधी मिळेल या हव्यासापोटी हजारो कोंबड्यांचा बळी घेतला. पण, कोंबड्याचा बळी देणे त्याला चांगलेच महागात पडले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपूर्ण जगात कोरोनाची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथे घडला आहे. एका पोल्ट्रीचालकाने कोरोनाच्या नावाने कोंबड्या पुरण्याची केलेली स्टंटबाजी उघड झाली आहे.

12 मार्च रोजी दरेगाव येथील पोल्ट्री चालकाने अनेक माध्यम प्रतिनिधींना बोलावून 21 हजार जिवंत कोंबड्या पुरल्याचा दावा केला होता. मात्र, त्या पोल्ट्री चालकाचा हा पब्लिसिटी स्टंट असून शासनाकडून निधी मिळवण्याच्या उद्देशाने त्याने असा प्रकार केल्याची बातमी न्यूज 18 लोकमत ने प्रसारित केली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता खरं प्रकार समोर आला.

जगदंबा पोल्ट्री फार्मच्या लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेली स्टंटबाजी महागात पडली आहे. कोरोना विषाणूमुळे कोंबडी बाजारपेठेत विक्री होत नाही. तर त्यांना सांभाळण्याचा खर्च होत नसल्याने त्यांनी १२ मार्च रोजी २१ हजार कोंबडी 10X10 च्या खड्ड्यामध्ये जेसीबीच्या साह्याने जिवंत गाडल्या होत्या. याची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे औंढा यांना देण्यात आली. निवेदन देऊन 21 हजार कोंबड्यांचे शासनाने अनुदान द्यावे म्हणून मागणी केली होती.

पोलिसांनी प्रत्यक्ष पोल्ट्री फार्मवर जाऊन पाहणी केली असता, 8 हजार कोंबड्या जिवंत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे कोंबडी उत्पादकांना 21 हजार पक्षी खड्ड्यांमध्ये गाडल्याची खोटी माहिती दिली असे निदर्शनास आले. तर खड्ड्यात जेसीबीच्या साह्याने केवळ ३ हजार जिवंत कोंबड्या व 3 हजार मरण पावलेल्या कोंबड्या गाडल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

कोंबडी उत्पादकाने शासनाकडून अनुदान मिळावे म्हणून प्रशासनाला खोटी माहिती देत देत अनुदानाची मागणी केली. खड्ड्यांमध्ये विनापरवानगी आणि हिंसकपणे पक्ष्यांची हत्या केल्याने कोंबडी उत्पादक लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड या दोघांवर चौकशीअंती औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

First published: