मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, फडणवीसांचा थेट इशारा

वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, फडणवीसांचा थेट इशारा

 
माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे.

माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे.

माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Navi Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

नवी मुंबई, 25 सप्टेंबर : 'माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे. वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार त्यांची कोणीही शिफारस घेऊन येऊ नये, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी झटलेले थोर नेते कै. अण्णासाहेब पाटील यांची 89वी जयंती आणि भव्य माथाडी कामगार मेळावा नवी मुंबईतील तुर्भे इथं पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते.

50 हजार मराठा तरुणांना,उद्योजक बनण्याची संधी मिळाली. नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही केलं. हेच काम 15/20 वर्षांपासून सरकारने केलं असतं तर 2 ते अडीच लाख उद्योजक झाले असते, असं म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

प्रवीण दरेकर यांच्याकडे नरेंद्र पाटील यांनी 250 कोटी द्या हा प्रेमाचा दम आहे. प्रवीण दरेकर हे माथाडी कामगारांच्या घरासाठी, मुंबई बँक पैसे कमी पडू देणार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ जबाबदारी, नरेंद्र पाटील यांना द्या ही माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो, असंही फडणवीस म्हणाले.

माथाडी चळवळीमध्ये काही लोक शिरलेले आहे. त्यांच्या नावाने चुकीचे काम करत आहे. माथाडी दाखवायचे आणि त्यांना कामाच द्यायचे नाही. माथाडी कामगारांच्या नावावर वसुली करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे. वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार, त्यामुळे त्यांची कोणीही शिफारस घेऊन येऊ नये, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

First published: