मोठी बातमी! मुंबईच्या मध्यवर्ती भागातील हा वॉर्ड बनला आता 'कोरोना हब'

मोठी बातमी! मुंबईच्या मध्यवर्ती भागातील हा वॉर्ड बनला आता 'कोरोना हब'

मुंबईत सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण संख्या असलेला परिसर म्हणून जी दक्षिण विभागाकडे बघितलं जात होतं.

  • Share this:

मुंबई, 29 मे: मुंबईत सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण संख्या असलेला परिसर म्हणून जी दक्षिण विभागाकडे बघितलं जात होतं. पण आता विभाग कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबई शहराचा अगदी मध्यवर्ती भाग म्हणजेच दादर, माहीम आणि धारावी या भागांचा समावेश असलेला जी उत्तर वॉर्डमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे.

हेही वाचा.. मोठा दिलासा! बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक, एकाच दिवशी 8381 डिस्चार्ज

जी उत्तर वॉर्ड आता कोरोना हब बनला आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या 2816 वर पोहोचली आहे. इतकी जास्त रुग्ण संख्या घेऊन मुंबईतला हा वॉर्ड आता सगळ्यात जास्त धोकादायक ठरला आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्ण संख्या ही धारावीमध्ये आहे. त्यानंतर माहीम आणि सरतेशेवटी दादरचा क्रमांक लागतो.

जी उत्तर विभागाच्या पाठोपाठ मुंबईतील ई विभाग म्हणजेच भायखळा हा परिसर 2487 रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर, सायन वडाळा हा परिसर 2457 रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर, कुर्ला म्हणजे एल वॉर्ड हा 2417 रुग्णांचा चौथ्या क्रमांकावर, 2155 गुणांसह बांद्रा पूर्व हा परिसर पाचव्या क्रमांकावर तर 2121 रुग्णांसह अंधेरी-पश्चिम हा सहाव्या क्रमांकावर आणि 1966 रुग्णांसह मुंबईला वरळी विभाग हा सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मुख्य म्हणजे गेल्या आठवड्याभरात मुंबईतल्या तीन विभागात सर्वात जास्त रुग्ण संख्या वाढीचा वेग दिसून येत आहे.

हेही वाचा..धक्कादायक! कोरोनाची धास्ती वाढली, आता तर नातेवाईकही स्विकारत नाही मृतदेह

सर्वात जास्त रुग्ण संख्या वाढीचा वेग था 8.8 असून तो घाटकोपर विभागात वाढताना दिसतो आहे. त्यानंतर 8.2 दराने भांडुप येथे रुग्ण संख्या वाढताना दिसते आहे तर 8.1 या दराने बोरीवली या विभागात रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे.

First published: May 29, 2020, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading