काँग्रेसचे हे संकटमोचक नेते उद्या येणार महाराष्ट्रात?

काँग्रेसचे हे संकटमोचक नेते उद्या येणार महाराष्ट्रात?

भाजपच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्षही वेगवेगळे डावपेच आखतायत. आता कर्नाटकमधले काँग्रेसचे संकटमोचक नेते महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यात एकेक पुढचे अंक सुरू आहेत. उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. भाजपने सत्तास्थापनेसाठी आमदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी नारायण राणे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील आणि बबनराव पाचपुते या चौघांवर सोपवली आहे.

भाजपच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्षही वेगवेगळे डावपेच आखतायत. आता कर्नाटकमधले काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार काँग्रेस नेत्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

याआधीही झालं होतं सत्तानाट्य

महाराष्ट्रातलं सत्तानाट्य पाहून कर्नाटकमध्ये झालेल्या राजकीय नाट्याची आठवण सगळ्यांनाच होतेय. याच सत्तानाट्यात भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं सरकार पाडण्यात डी. के. शिवकुमार यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आणि शिवकुमार यांच्या कामाला सुरवात झाली. काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं, त्यांचा भाजपशी संपर्क येऊ नये याची काळजी घेणं अशी कामं त्यांनी नेटानं पार पाडली आणि भाजपच्या दिग्गजांना घाम फोडला.

(हेही वाचा : अजित पवारांवर भाजपची मदार, काय आहे बहुमताचा गेमप्लॅन?)

बसमधून विधानसभेत

शेवटच्या टप्प्यात काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना हैदराबादला घेऊन जाणं आणि विश्वासदर्शक ठरावासाठी परत विधानसभेत घेऊन येणं ही जबाबदारीही त्यांनी फत्ते केली. शेवटच्या दिवशी तर ते स्वत: प्रत्येक आमदाराला बसमधून घेऊन विधानसभेत त्यांच्या आसनापर्यंत घेऊन जात होते. या आधीही त्यांनी अनेकदा संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती.

===============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2019 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading