Home /News /maharashtra /

हा रस्ता मला छळतो, गुन्हा दाखल करा; औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार

हा रस्ता मला छळतो, गुन्हा दाखल करा; औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार

मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता माझी अडवणूक करत असल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 06 डिसेंबर : औरंगाबादमध्ये (Aurangabad) चक्क एका रस्त्याविरोधात पोलीस तक्रार (police complaint)दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  मानसिक, शारीरिक, आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता माझी अडवणूक करत असल्याची तक्रार एका प्रयोग शाळा तंत्रज्ञ महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून त्या कार्यरत असून त्या रोज औरंगाबाद ते फुलंब्री असा अप-डाउन प्रवास करत असतात. पण, दररोज खराब रस्त्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांनी थेट  औरंगाबाद-फुलंब्री या रस्त्या विरोधातच पोलिसात तक्रार केली आहे. अंबरनाथमध्ये रेल्वे गाडीजवळ अग्नितांडव, घटनेचा LIVE VIDEO हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की व अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल, त्याच्यामध्ये काही बदल होईल,  अशी मला आशा होती. मात्र, तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला.  असल्याचे  तक्रारीत म्हटलं आहे. तसंच,  या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, हा रस्ता मला वारंवार मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास देत आहे. त्यामुळे तो माझ्यावर कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे फुलंब्री ते औरंगाबाद या रस्त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, अशी मागणीही तक्रारदार महिला संध्या घोळवे-मुंडे यांनी केली आहे. दोन वाघांमध्ये तू-तू मैं-मै, एकमेकांना धरून लोळवलं, लढाईचा जबरदस्त VIDEO VIRAL या बाबत संध्या यांना विचारले असता, 'या रस्त्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागत आहे. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी तक्रार दिली आहे. प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचंही संध्या घोळवे-मुंडे यांनी सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या