• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'हे तर तुमचं कर्तव्य', उदयनराजे भोसलेंचा अजित पवारांना खोचक टोला

'हे तर तुमचं कर्तव्य', उदयनराजे भोसलेंचा अजित पवारांना खोचक टोला

सूचना आम्ही वेळोवेळी देत जाऊ त्या आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारख्या तज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि...

सूचना आम्ही वेळोवेळी देत जाऊ त्या आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारख्या तज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि...

सूचना आम्ही वेळोवेळी देत जाऊ त्या आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारख्या तज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि...

  • Share this:
सातारा, 02 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे सातारा (satara) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. तुम्ही जास्तीत जास्त दौरे साताऱ्यात करा म्हणजे माझ्या विचारांना चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करणं तुमचं कर्तव्य आहे' असं म्हणत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayan raje bhosle) यांनी अजितदादांना खोचक टोला लगावला. रात्रीस खेळ चाले मालिकेचे अण्णा नाईक फेम अभिनेते माधव अभ्यंकर यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना उदयनराजे यांनी मालिकेतील सर्व कलाकारांचं कौतुक केलं. तसंच, सध्या सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे सुरू आहेत याबाबत खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्या वाढत्या दौऱ्यांवर खोचक टीका केली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री करतेय लग्न; सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी 'उपमुख्यमंत्री यांना सांगितलं आहे की, जास्तीत जास्त दौरे साताऱ्यात करा म्हणजे माझ्या विचारांना चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करणं तुमचं कर्तव्य आहे. सूचना आम्ही वेळोवेळी देत जाऊ त्या आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारख्या तज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि ते करतील, असं उदयनराजे म्हणाले. पुणे: दाढी करण्यासाठी सलूनमध्ये शिरला अन् चोरट्यानं 2 लाखांवर फिरवला वस्तारा तसंच, 'सातारा जिल्ह्याला लाभलेली जी नैसर्गिक देणगी आहे, त्यात पर्यटनाच्या माध्यमातून एमटीडीसी किंवा इतरांबाबत आदित्य ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. नवरात्रीनंतर आम्ही भेटणार आहोत. सर्वाधिक धरणं असलेला हा जिल्हा आहे. व्याघ्र प्रकल्प आहे, महाबळेश्वर, पाचगणी आहे,  त्यामुळे जास्तीत जास्त स्पोर्ट प्रकल्प राबवले जावे. सिनेमाचं शुटिंग इथं वाढावं, त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळेल' अशी माहिती उदयनराजेंनी दिली.
Published by:sachin Salve
First published: