मुंबई, 26 फेब्रुवारी : महाराष्ट्राचं सरकार विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नाहीत. ठाकरेंबाबत नक्कीच काहीतरी गडबड आहे. उद्धव ठाकरे इतके कपटी नाहीत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आज ज्या पद्धतीने गेल्या सरकारची कामे रोखण्यात येत आहेत.. कामांचा तपास केला जात आहे... त्यावरुन असं दिसतंय की उद्धव ठाकरे दबावाखाली आहेत, असा धक्कादायक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
दिल्लीत जो हिंसाचार सुरू आहे तो ‘स्पाँन्सर्ड टेररिजम’ म्हणजेच प्राय़ोजित दहशतवाद आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या घटनांना माओवादी आणि नक्षलवाद्यांचा पाठिंबा आहे. दुर्देवाने देशातील मोठ मोठे नेतेही त्यात अडकले जात आहेत, असे म्हणत पाटील यांनी दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर मत व्यक्त केलं. गेल्या अनेक दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘महात्मा गांधींनी जर ‘अहिंसे’च्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवू दिले तर स्वातंत्र्यवीर सावरकर ‘क्रांती’च्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी लढले. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रातिंकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी सावकरांचे मोठे योगदान राहिले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार जर सावरकरांच्या मुद्द्यावर विरोध करत असतील वा या कारणाने सदन सोडतील तर त्यांचा अजेंडा लक्षात येईल’. शिवसेना ही सावरकरांच्या मुद्द्यावर इतकी लाचारी का पत्करत आहे, असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. एल्गार परिषदेची व्यापी महाराष्ट्राबाहेर असल्याकारणाने याचा तपास NIA सोपविण्यात आल्याचे सांगितले. जंगलात राहून हत्यार उचलणाऱ्यांपेश्रा अर्बन नक्षलवादी अधिक धोकादायक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा - 'बांगड्या' वक्तव्यावरून माफी मागा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका
'एल्गार परिषद' प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार, हे आहे कारण