• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'शरद पवारांकडून हे अपेक्षितच नाही', फडणवीसांचं आता नागपुरातूनच थेट उत्तर

'शरद पवारांकडून हे अपेक्षितच नाही', फडणवीसांचं आता नागपुरातूनच थेट उत्तर

 

'मला असं वाटत आहे, त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घेणे गरजेचं आहे.'

'मला असं वाटत आहे, त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घेणे गरजेचं आहे.'

'मला असं वाटत आहे, त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घेणे गरजेचं आहे.'

  • Share this:
नागपूर, 20 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या अटकेनंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शितयुद्ध पेटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण करत भाजपला इशारा दिला होता. तर, 'शेवटी शरद पवार (sharad pawar) हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घ्यावी लागते. खरं म्हणजे, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून असं अपेक्षितच नाही' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्या विधानावरून टोला लगावला. 'मला असं वाटत आहे, त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घेणे गरजेचं आहे. शेवटी शरद पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घ्यावी लागते. खरं म्हणजे, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून असं अपेक्षितच नाही', असं फडणवीस म्हणाले. Latent View Analytics IPO : GMP आधारावर इश्यूच्या दमदार एन्ट्रीचे संकेत तसंच, 'जी काही घटना अमरावतीमध्ये झाली आहे ती कशामुळे झाली आहे. आदल्या दिवशी जो मोर्चा निघाला होता, त्या मोर्चादरम्यान तोडफोड झाली होती. एका कपोलकल्पित घटनेच्या आधारावर हिंदूंची दुकानं फोडण्याचे काम झाले. त्यामुळे यावर सेक्युलर का बोलत नाही, हा माझा सवाल आहे. त्यामुळे प्रश्न काय आहे आणि तो कुणी निर्माण केला आहे, त्यामुळे अशा प्रकारे भाजपवर कुणी आरोप करून प्रश्न सुटणार नाही' असंही फडणवीस म्हणाले. काय म्हणाले होते पवार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची आठवण काढली. NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इथे 100 जागांसाठी पदभरती 'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की मी नागपूरला आलो व अनिल देशमुख माझ्या सोबत नाही. अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळलं. मात्र काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुउपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायची असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नसले त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपवर घणाघात केला. तसंच, ' अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published: