मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज्यपालांना कंगनाला भेटण्यासाठी वेळ, मात्र शेतकऱ्यांना भेट नाही', शरद पवारांची पुन्हा विखारी टीका

'राज्यपालांना कंगनाला भेटण्यासाठी वेळ, मात्र शेतकऱ्यांना भेट नाही', शरद पवारांची पुन्हा विखारी टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांवरही घणाघाती टीका केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांवरही घणाघाती टीका केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांवरही घणाघाती टीका केली.

मुंबई, 25 जानेवारी : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांवरही घणाघाती टीका केली. 'राज्याचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून भेटण्याचे सौजन्य राज्यपालानी दखवायला हवं होतं. ती संवेदना राज्यपालांना हवी होती. महाराष्ट्राच्या राज्यपालांना अभिनेत्री कंगना रणौतला भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत कधी असले राज्यपाल नव्हते,' अशा खरमरीत शब्दांत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, राज्यपाल आणि शेतकरी शिष्टमंडळ भेट होणार नाही. कारण राज्यपाल आज गोव्यात आहेत, ते मुंबईत रात्री उशिरा येतील. शिष्टमंडळ राज्यपाल यांच्या सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. हेही वाचा - भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल या मोर्चात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फटकारलं आहे. 'शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर उतरला आहे, पण पंतप्रधानांनी त्यांची चौकशी केली का? पंजाब शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का?' असा सवाल करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : त्यांच्या हातात सत्ता पण शेतकरी कष्टकरी यांची किंमत नाही - पवार यांची मोदी सरकारवर टीका - वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रचंड अभूतपूर्व शांततामय आंदोलन केले. त्यास पाठिंबा देण्यासाठी येथे शेतकरी आले त्यांचे अभिनंदन - सरकारने घटनेचा विचार न करता पायमल्ली करून कायदे केला, बहुमताच्या जोरावर कायदा केला - बहुमत डावलत कायदा केला तर जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहत नाही - कायदे करताना चर्चा होऊन एकमताने मंजूर केले जातात, चर्चा नाही... समिती नाही.. अशी कायदा करताना केंद्र सरकारची भूमिका राहिली, चर्चा न करता कायदा मंजूर केला - मी इतरांच्या पक्षाचं काय आहे, हे फारसं बघत नाही, मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पाठिंबा द्यायला आलो आहे, असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीवर केलं भाष्य
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Sharad pawar

पुढील बातम्या