पुराच्या पाण्यात वाहून गेली रिक्षा, मामाच्या भेटीस गेलेल्या शेंदुर्णीच्या बालकाचा मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून गेली रिक्षा, मामाच्या भेटीस गेलेल्या शेंदुर्णीच्या बालकाचा मृत्यू

पुराच्या पाण्यात रिक्षा वाहून गेल्याने मामाच्या भेटीस गेलेल्या शेंदुर्णीच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. पाचोरा तालुक्यातील रोटवद-कासमपुरा येथील फरशी पुलावर हा थरार पाहायला मिळाला.

  • Share this:

जळगाव, 11 सप्टेंबर: पुराच्या पाण्यात रिक्षा वाहून गेल्याने मामाच्या भेटीस गेलेल्या शेंदुर्णीच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. पाचोरा तालुक्यातील रोटवद-कासमपुरा येथील फरशी पुलावर हा थरार पाहायला मिळाला. नाल्याला पूर असतानाही चालकाने रिक्षा टाकल्याने बालकाच्या जीवावर बेतले. दिनेश प्रवीण गुजर (वय-13) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, रोटवद-कासमपुरा फारशी पुलावरून पुराच्या पाण्यात मालवाहू रिक्षा वाहून गेल्याने शेंदुर्णी येथील दिनेश याचा मृत्यू झाला तर सहा जण थोडक्यात बचावले. ही घटना सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री साडे नऊ वाजल्याच्या सुमारास घडली. दिनेश हा मामाची भेट घेऊन परत येत होता. तेव्हा ही घटना घडली.

रोटवद शिवारात सोमवारी मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत होते, रोटवद -कासमपुरा दरम्यान असलेला लोहारा-जळगाव रोडवरील नाला पुराच्या पाण्याने प्रचंड वेगाने वाहत होता. शेंदुर्णी येथील मंडळी मालवाहू रिक्षाने घराकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने रिक्षा सह सात लोक वाहून गेले, सुदैवाने 6 जणांनी झाडाच्या फांद्या व झुडपाच्या सहाय्याने बचावले.

नांद्रा येथे खदानीत पाय घसरून बालकाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील एका सहा वर्षीय बालकाचा खदानीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमू तावडे असे मृत बालकाचे नाव आहे. सैन्य दलातील जवान नरेंद्र तावडे यांचा मुलगा व सरपंच शिवाजी तावडे यांचा पुतण्या आहे. सुटीवर आलेल्या वडीलांसोबत सोमू हा फिरायला गेला असता खदानीत पाय घसरल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

VIDEO:हर्षवर्धन पाटलांसोबत मुलगी काँग्रेस सोडणार नाही? अंकिता पाटील म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2019 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading