आता तर हद्द झाली, तब्बल 8 क्विंटल कांदा चोरांनी पळवला!

आता तर हद्द झाली, तब्बल 8 क्विंटल कांदा चोरांनी पळवला!

विशेष म्हणजे कांदा चाळींपासून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतांना चोरट्यांनी धाडस करून कांदे चोरून नेले.

  • Share this:

मनमाड, 25 ऑक्टोबर : सध्या कांद्याला (Onion Price) चांगला भाव मिळत असल्याचे पाहून चोरट्यांनी (Thief) त्यांचा मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. मनमाड (Manmad, nashik )तालुक्यातील बागलाणच्या जायखेडा इथं  नासीर पठाण यांनी चाळीत साठवून ठेवलेला 8 क्विंटल कांदा चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मनमाड तालुक्यातील बागलाण भागातील जायखेडा इथं राहणारे शेतकरी नासीर पठाण यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले होते. त्यांनी दरवर्षीप्रमाणे कांदा काढून चाळीत ठेवला होता. तब्बल 8 क्विंटल कांदा पठाण यांनी काढून ठेवला होता. शनिवारी रात्री चोरांनी संपूर्ण 8 क्विंटल कांदा चोरून नेल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ, पण.., पंकजा मुंडेंनी केली मोठी मागणी

विशेष म्हणजे, कांदा चाळींपासून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतांना चोरट्यांनी धाडस करून कांदे चोरून नेले.  त्यामुळे आता साठवून ठेवलेल्या कांदा वाचविण्यासाठी खडा पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पठाण यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कांदा चोरांचा शोध घेत आहे.

जुन्नरमध्येही कांदा चोरीची घटना उघड, चार जणांना अटक

दरम्यान,  जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीतून कांदा चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला 24 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसंच सात लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत विष्‍णू देसाई, राहणार डिंगोरे ता. जुन्नर यांनी तक्रार दिली होती.

'मोहन भागवत घाबरतात'; सरसंघचालकांच्या विधानावरुन राहुल गांधींचा घेराव

तक्रारदार वरद विष्‍णू देसाई यांच्या कांदा चाळीतील कांद्याच्या भरलेल्या पिशव्या चोरट्यांनी बराखीचे कुलूप तोडून चोरून नेल्या.  पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  गाडी आणि तरुणांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली या चोरीबाबतचा खुलासा झाला. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी सदर कांद्याची चोरी केल्याचे कबूल केले. तसंच कांद्याच्या चाळीतून कांदे चोरताना पिक अप गाडी आणि दोन दुचाकींचा वापर केला असल्याचे कबूल केले. सदर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कांदा पिशवी अंदाजे किंमत एक लाख 98 हजार 534, पिकअप 4 लाख, 2 दुचाकी एक लाख असा एकूण सहा लाख 98 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 25, 2020, 4:52 PM IST
Tags: onion

ताज्या बातम्या