Home /News /maharashtra /

संगमनेरमध्ये चोरांचा सुळसुळाट, बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, घटनेचा LIVE VIDEO

संगमनेरमध्ये चोरांचा सुळसुळाट, बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, घटनेचा LIVE VIDEO

 सोमवारी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला.

    सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 19 जुलै : संगमनेर तालुक्यातील साकुर येथील भरबाजारपेठेतील जिल्हा बँकेचे एटीएम (bank atm) फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. सोमवारी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास घटना घडली असून एटीएम ठेवलेले गाळ्याचे शटर उचकटण्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या आधी देखील संगमनेर तालुक्यात अनेकदा एटीएम फोडण्यात आले असल्यानं अशा प्रकारचे गुन्हे करणारी सराईत टोळी तालुक्यात कार्यरत असल्याच सांगितलं जात आहे. साकूर येथे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम आहे. दरम्यान सोमवारी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. तसेच एटीएमच्या शटरच्या एक साईट चोरट्यांनी तोडली, तसेच दुसरी साईट तोडत उचकटण्याचा प्रयत्न करत असताना आवाज झाला. आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिक जागे झाले. सध्या पावसाचे दिवस असल्सानं ग्रामीण भागात लवकरचं सामसूम होते. मात्र शटर तोडण्याचा आवाज मोठा असल्यानं स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव येत असल्याच पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला. जिल्हा बॅंकेच्या एटीएम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान पाच चोरटे याभागात वावरताना दिसून आले आहे. तर त्याच बरोबर एटीएमचे शटर उचकवटण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पाच ही चोरट्यांनी काळ्या रंगाचे शर्ट घातलेले असून चेहरा रुमालानं झाकलेला दिसून येत आहे. पोलिसांनी सर्व चित्रीकरण हस्तगत केले आहे तर चोरट्यांना शोध घेतला जात आहे. एटीएम फोडण्याच्या घटनेत तालुका अग्रस्थानी  एप्रिल 2018 : वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखे शेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन चोरट्यांनी फोडले होते. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून चोरटे पसार झाले होते. जून 2019 : शहरातील गुंजाळवाडी परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम 17 लाख रुपयांसह चोरट्यांनी पळवलं. मशीन तुटेना म्हणून चक्क एटीएमचं उचलून नेल होत. ऑगस्ट 2020 : शहरात फ्लोरा टाऊन अपार्टमेंट येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सीसीटीव्ही आणि सायरनची वायर तोडून मशिनचा हाँण्डलॉक तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नोव्हेंबर 2021 : तळेगाव दिघे येथील ओवरसीज बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकत 16 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. डिसेंबर 2021 : तालुक्यातील समनापूर येथे चोरट्यांनी जिलेटीनचा स्टोफ करत एटीएम फोडून चार लाखांहून अधिक रोकड लंपास केली होती
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या