• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • चोरांनी वाईन शॉप फोडलं अन् गल्लाच केला गायब, महागडी दारूही चोरली, LIVE VIDEO

चोरांनी वाईन शॉप फोडलं अन् गल्लाच केला गायब, महागडी दारूही चोरली, LIVE VIDEO

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू झाला आहे.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू झाला आहे.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू झाला आहे.

  • Share this:
  उल्हासनगर, 19 सप्टेंबर : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar ) चोरांनी एक वाईन शॉपचे (wine shop) दुकान फोडले. दुकान फोडल्यानंतर चोरांनी पैसे न नेता गल्लाच उचलून नेला. एवढंच नाहीतर महागडी दारू सुद्धा चोरांनी गायब केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात विकी वाईन्स या दारूच्या दुकानात चोरी झाली. कॅम्प नंबर १ च्या खेमानी भागात हे विकी वाईन्स आहे. रात्री दुकान बंद झाल्यानंतर चोरांनी मोठ्या शिताफीने ही चोरी केली.  रिक्षात असलेल्या चोरांनी आधी दुकानाचे शटर उचकटून आता प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर पैसे कुठे आहे का हे तपासून पाहिलं. मात्र मोठी रक्कम काही हाती लागली नाही. त्यामुळे या चोरांनी दुकानातील पैशाचा गल्ला लंपास केला. तसंच, महागड्या दारुच्या बाटल्या चोरून पोबारा केला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हे चोरी झाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू झाला आहे. हेडफोनसाठी मित्राने केला मित्राचा खून दरम्यान, उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या आठवड्यभरापासून खून आणि हत्याचे (murder) सत्र सुरूच आहे. साधे हेडफोन दिला नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. निर्दय! प्रियकरासोबत गेली होती पळून, सासरी परतण्यासाठी दिला पोटच्या मुलांचा बळी शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर सोनवणे या तरुणाची त्याचाच मित्र शिवड्या उर्फ सुरेश शिंदे यांनी चाकू भोसकून हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर, आरोपी सुरेश आणि त्यांचे मित्र एकत्र दारू पीत बसले होते. याच वेळी आरोपी सुरेश याने ज्ञानेश्वरच्या नकळत त्याचा हेडफोन (headphones) आणि मोबाईल (moblie) स्वतः जवळ ठेवला. तो परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने ज्ञानेश्वरला भोसकून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
Published by:sachin Salve
First published: