सातारा, 03 मार्च : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे. चोरांनीही आता पेट्रोलकडे मोर्चा वळवला असून साताऱ्यात (Satara) पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे.
पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेहणारी पाईपलाईन फोडल्याची घटना उजेडात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ चोरट्यांनी भगदाड पाडले. लाखो रुपयांचे पेट्रोल चोरट्यांनी चोरून नेले.
पण, पेट्रोल चोरी केल्यानंतर फोडलेली पेट्रोलची पाईपलाईन तशीच ठेवून चोर पसारा झाले. त्यामुळे
हजारो लिटर पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला. पेट्रोल जमिनीत मुरल्याने पाईपलाईन असलेल्या परिसरातील दोन विहिरी पेट्रोलने भरल्या आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाहीतर शेतातील उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे.
आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न
विहिरीत पेट्रोल आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील लोकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे. पण, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून अग्निविरोधक यंत्र विहिरीजवळ ठेवण्यात आले असून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी हजर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Petrol