मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /देवाला नमस्कार करुन दुकानातील कॅश लांबवली अन जाता-जाता देवाऱ्यातील नोटही चोरली, घटना CCTV मध्ये कैद

देवाला नमस्कार करुन दुकानातील कॅश लांबवली अन जाता-जाता देवाऱ्यातील नोटही चोरली, घटना CCTV मध्ये कैद

LIVE VIDEO: तो आला देवाच्या पाया पडला आणि मग दुकानातील गल्लाच लांबवला, घटना सीसीटीव्हीत कैद

LIVE VIDEO: तो आला देवाच्या पाया पडला आणि मग दुकानातील गल्लाच लांबवला, घटना सीसीटीव्हीत कैद

ठाण्यातील एका चोराचा चोरी करण्यापूर्वी देवाच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता असाच एक व्हिडीओ यवतमाळमधून समोर आला आहे.

यवतमाळ, 4 डिसेंबर : माणसाच्या आयुष्यात श्रद्धा खूप महत्वाची समजल्या जाते. श्रद्धेच्या जोरावर तो अनेक काम यशस्वी पणे पार पाडतो. कुठल्या ही कामाची सुरुवात करतांना तो कुठे तरी नतमस्तक होतो आणि नंतर कामाला सुरुवात करतो. मात्र आता एक वेगळीच घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (thief act caught in cctv) झाली. ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्याच्या नेर (Ner, Yavatmal) येथील ही घटना आहे. चोरी करण्यासाठी चोर एका दुकानात शिरतो आणि त्याला त्या ठिकाणी देव्हारा दिसला. तो सर्व प्रथम या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यानंतर तो आपल्या कामाला म्हणजेच चोरीला सुरुवात करतो. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (thief video viral) झाला असून त्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

नेर बसस्थानकासमोर भूषण गुगलिया यांचे जिओ कंपनीचे दुकान आहे. 2 डिसेंबरला रात्री दरम्यान दुकान बंद करून तो वरच्या माळ्यावर राहत असलेल्याने घरी गेला. 3 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान एका अज्ञात चोरट्याने दुकानात मागच्या दाराने प्रवेश केला. प्रवेश करताच समोर असलेल्या देवाह्यातील मूर्तीला चक्क नमस्कार करून चोरट्याने दुकानातील सर्व ड्रॉवर फोडल्याचा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून उघडकीस आला आहे.

अलिबागमध्ये पॅरासेलिंग करताना दोर तुटला, दोन महिला पाण्यात कोसळल्या, LIVE VIDEO

देवाऱ्यातील नोटही केली लंपास

चोरटयाने अलगद लोखंडी अवजाराने एका पाठोपाठ काउंटरमधील सर्वच ड्रावर फोडले. मात्र दुकानातील रोकड आणि लॅपटॉप हे रात्रीच दुकानदाराने घरी नेल्याने चोरट्याच्या हाती फारसे काही लागले नाही. फोडलेल्या एका ड्रॉवरमध्ये चारशे रुपये होते. ते पैसे तसेच ठेवून चोरट्याने दुकानातील एक पेन ड्राईव्ह आणि देवाजवळ ठेवलेली दहा रुपयाची नोट लंपास केली.

शेजारील दुकानात चोरीचा प्रयत्न

हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमधे रेकॉर्ड झाला आहे. त्यानंतर बाजूलाच असलेल्या त्याच मालकाच्या वर्धमान वस्त्रालय या दुकानात सुद्धा चोरटयाने प्रवेश करीत दुकानातील ड्रावर फोडून चाचपणी केली. तिथेही हाती काहीच न लागल्याने चोरट्याने मध्यरात्री तिथून पळ काढला.

तालुक्यात गेल्या महिनाभरापासून चोरी, लुटमारी, घरफोडी सारख्या घटना वाढतच आहे. चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी बाजारपेठेतील व्यवसायिक, गृहस्थांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहे. मात्र चोरी करताना संपूर्ण चेहरा कापडाने झाकून चोरटे आपला डाव साधत असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा कितपत उपयोग हा प्रश्न उपस्थित होत आहे. अलिकडे गुन्हेगारी करतांना धार्मिकवृत्तीचा प्रयोग पाहायला मिळत आहे. मात्र कुठलाही धर्म गुन्हा करण्याचे शिकवत नाही. हे खरी असले तरी, ते गुन्हेगारांना कधी उमगणार हा खरा प्रश्न आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Viral video., Yavatmal