Friendship Day : मैत्रीतूनच भेटतात त्यांना 'नातवंडं'

Friendship Day : मैत्रीतूनच भेटतात त्यांना 'नातवंडं'

पुण्यातल्या अभिनव विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी 'मातोश्री ओल्डएज होम' मधल्या आजी आजोबांसोबत आगळा वेगळा 'फ्रेंडशीप डे' साजरा केला.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 5 ऑगस्ट : 'फेसबुक', 'ट्विटर', 'इन्स्टाग्राम'वर फ्रेंड बनवण्यापेक्षा, वृद्धाश्रमातल्या आजी-आजोबांसोबत मैत्री करण्याचा संकल्प पुण्यातल्या अभिनव विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केलाय. या विद्यार्थ्यांनी पुण्यातल्याच 'मातोश्री ओल्डएज होम' मधल्या आजी आजोबांसोबत आगळा वेगळा फ्रेंडशीप डे साजरा केला. नात्यांच्याही पलीकडे जपलं जाणारं हे नातं जपण्यासाठी आज कुठे सुरांचा धागा जुळल्या, तर कुठे मायेच्या धारा बरसल्या. अभिनव कॉलेजचे विद्यार्थी हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आणि तरुणांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय.

तर दुसरीकडे, पुण्यातल्या अभिनव विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी 'फेसबुक', 'ट्विटर', 'इन्स्टाग्राम'वर फ्रेंड बनवण्याएवजी 'मातोश्री ओल्डएज होम' मधल्या आजी आजोबांसोबत आगळा वेगळा फ्रेंडशीप डे साजरा केला. वृद्धाश्रमातले आजी-आजोबा दरवर्षी कॉलेजमधल्या अकरावीच्या मुलामुलींची डोळे लावून वाट पाहत असतात. कारण गेली 10 वर्षं न चुकता फ्रेंडशीप डे निमित्त या कॉलेजचे विद्यार्थी वृद्धाश्रमात येतात आणि या आजी आजोबांना फ्रेंडशीप बँड बांधतात, गुजगोष्टी करतात आणि त्यांची मायेने विचारपूसही करतात.

विभक्त कुटुंब पद्धती, स्पर्धेचं युग, डबल इन्कम इत्यादी गोष्टींमुळे वृद्ध आई-वडिल म्हणजे घरात अडगळ किंवा अडचण वाटण्याचा जमाना आहे. त्यामुळे वर्षांतून एकदा का होईना या मुलांच्या रुपानं आपली नातवंडं भेटण्याचा आनंद या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय असं या उपक्रमाचे समन्वयक बंगाळे यांनी सांगितलं.

'फ्रेंडशीप डे'चं महत्त्व फक्त हातावर फ्रेंडशीप-बँड बांधण्यापुरतं मर्यादित न ठेवता, अभिनव कॉलेजचे विद्यार्थी हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आणि तरुणांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय.

First published: August 5, 2018, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading