Home /News /maharashtra /

...ते अपघात नसून महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच-धनंजय मुंडे

...ते अपघात नसून महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच-धनंजय मुंडे

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू हे अपघात नसून महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सरकारवर हल्लाबोल केला.

    मुंबई, ता. 16 जुलै : कल्याण -डोंबिवलीमध्ये खड्ड्यांमुळे झालेले पाच मृत्यू असो की, चंद्रपूर मध्ये झालेले मृत्यू, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू हे अपघात नसून शहराची महापालिका आणि राज्य शासनाने मिळुन केलेले हे खूनच आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. लज्जास्पद, भारताच्या सुवर्णकन्येची 'गुगल'वर शोधली गेली ‘जात’ VIDEO : रुग्नवाहिका मिळाली नाही,भरपावसात पार्थिव रिक्षाच्या टपावरून ठेवून नेले राज्यात खड्ड्यांमुळे होत असलेले मृत्यू या मुद्दावर बोलतांना धनंजय मुंडे यांनी राज्यातील रस्त्यांवर खड्यांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहता महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला असून, ही बाब गंभीर असल्याचे ते म्हणाले. हे मृत्यू म्हणजे खून असून, रस्त्यांच्या कंत्राटातील टक्केवारी आणि माणसांच्या जीवाबाबतची बेफिकरी जबाबदार असल्याचा असल्याचा घणाघाती आरोप त्यानी केला. VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य कल्याणच्या ज्या चौकात आरोह आतराळे याचा खड्यामुळे मृत्यू झाला तो खड्डा बुजवावा म्हणून महापालिकेला त्याच्या वडिलांनी पत्र देऊनही कारवाई झाली नाही, त्यातच मनिषा भोईर यांचा बळी गेला. लोकांच्या जीवाबद्दल प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा मग्रुरी आणि अमानुषपणा असल्याने या दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्यांमुळे होणारे मृत्यूवरून केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही त्यांनी यावेळी निषेध केला. जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

    VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा 

    First published:

    Tags: Chandrapur, Comment in house, Dhananjay munde, Kalyan, Khadde, Murders, Potholes on the road, अपघात नसून खून, कल्याण, चंद्रपूर, धनंजय मुंडे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे

    पुढील बातम्या