Home /News /maharashtra /

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे हे आहेत नॉट रिचेबल आमदार, का झाले दिग्गज नाराज?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे हे आहेत नॉट रिचेबल आमदार, का झाले दिग्गज नाराज?

काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर (mlc election) काही तासात राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

  मुंबई 21 जून : सत्ता स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (mahavikas aghadi government) तिन्ही पक्षातील काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान ही खदखद काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर (mlc election) काही तासात राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार (shivsena mla) बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतमधील (eknath shinde in surat) एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता मोठ्या तयारीला लागले आहेत. भाजपही (bjp) आता सरकार स्थापनेसाठी कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान जे आमदार नाराज आहेत त्या आमदारांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे.

  दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या 10 आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठेपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

  हे ही वाचा : Congress mla Maharashtra : आता काँग्रेसचे 10 आमदार बाहेर पडणार? विजय वडेट्टीवार यांच्या मनात आहे तरी काय?

  हे आहेत नॉट रिचेबल आमदार

  एकनाथ शिंदे – कोपरी, अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई – पाटण, सातारा, संदीपान भुमरे – पैठण, औरंगाबाद, उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद, भरत गोगावले – महाड, रायगड, नितीन देशमुख – बाळापूर, अकोला, अनिल बाबर – खानापूर,आटपाडी सांगली, विश्वनाथ भोईर – कल्याण(प), संजय गायकवाड - बुलढाणा, संजय रामुलकर - मेहकर, महेश शिंदे – कोरेगाव, सातारा, शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर, प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर, संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ, ज्ञानराज चौघुले – उमरगा, उस्मानाबाद, तानाजी सावंत – पारंडा, उस्मानाबाद, संजय शिरसाट – औरंगाबाद(प), रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद, सुहास कांदे, नांदगाव, नाशिक, बालाजी कल्याणकर , नांदेड उत्तर, शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण, महेंद्र दळवी, अलिबाग, महेंद्र थोरवे, कर्जत हे आमदारा नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे.

  हे ही वाचा : eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या मनात वेगळंच चाललंय? राज्यात येणार नवा पक्ष?

  कोल्हापूर राधानगरीचे आमदार अबिटकर परत येणार

  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीचे मतदारसंघातील आमदार प्रकाश अबिटकर नाराज आमदारांसोबत असल्याचे बोलले जात होते. दरम्यान त्यांनी सुरतमधून संपर्क साधला आहे माझा भाऊ आणि मी शिवसेनेसोबत आहे. मी सुरतमधून येणार आहे. माझे बंधू  वर्षाबंगल्यावर लवकरच दाखल होणार आहे.  यामुळे मी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Vijay wadettiwar

  पुढील बातम्या