गणेश मंडळांनो, 'नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा बाप्पा' अशी जाहिरात करताना सावधान...!

गणेश मंडळांनो, 'नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा बाप्पा' अशी जाहिरात करताना सावधान...!

सार्वजनिक गणपतीसाठी 'नवसाला पावणारा', 'इच्छापूर्ती करणारा' अशा टॅगलाइन वापरून गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं वेड आता मोठ्या मंडळांसह लहान मंडळांतही झपाट्याने पसरताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा बाप्पा' अशा जाहिराती आपण सहज एखाद्या मंडळाबाहेर पाहतो. त्यावर भक्तांची मोठी गर्दी होते. लोक आपल्या इच्छा बाप्पाकडे मागण्यासाठी नवस करतात. पण 'नवसाला पावण्याचे' दावे करणाऱ्या गणेश मंडळांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. नवसाला पावणारा गणपती अशी खोटी जाहिरात करणाऱ्या गणेश मंडळांनो सावधान व्हा. कारण, संबंधित मंडळांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक गणपतीसाठी 'नवसाला पावणारा', 'इच्छापूर्ती करणारा' अशा टॅगलाइन वापरून गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं वेड आता मोठ्या मंडळांसह लहान मंडळांतही झपाट्याने पसरताना दिसत आहे. मंडळांचं हे मार्केटिंग कौशल्य अंधश्रद्धेकडे झुकत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंडळांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भक्तांना अशा पद्धतीने जाहिराती करून आकर्षित करण्याचे फंडे गणेश मंडळाने टाळावे.

सगळ्यात मोठी धूम ही गणेशोत्सवात असते. संपूर्ण जगभरात बाप्पाचं मोठ्या धुमधडाक्यात स्वागत होतं. हल्ली बाप्पाचं आगमनही शाही असतं. त्यासाठी धोल पथकांच्या रांगा लागतात. डीजे-डॉल्बीने परिसर दणाणून निघतो. पण या सगळ्यात कुठेतरी स्पर्धा सुरू झाली. आपलं मंडळ सगळ्यात सरस दाखवण्यासाठी बाप्पाचंही मार्केटिंग केल्याचं पाहायला मिळतं. त्य़ामुळे अशा मंडळांवर चपराक बसवण्यासाठी खोट्या जाहिराती न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : आठ क्लिंटल सुका मेवा, दोन लाख नारळ, ‘GSB’चा श्रीमंत उत्सव!

दोन लाख नारळ, एक क्विंटल सुवासिक फुलं, दीड लाख सफरचंद, दीड लाख डाळींब, 8 क्विंटल सुकामेवा, 12 क्लिंटल गुळ, काही क्विंटल शुद्ध तूप, 80 हजार स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप, दररोज 15 हजार भाविकांना फलाहार आणि 15 हजार भाविकांना दुपारचं जेवण. 65 किलो सोनं आणि 350 किलो चांदिचे दागिने. हे वाचून तुम्हाला दक्षिणेतल्या एखाद्या मोठ्या मंदिरातल्या उत्सवाची ही सगळी तयारी आहे असं वाटेल. मात्र, अशी सगळी जय्यत तयारी सुरू आहे ती ‘जीएसबी’ गणपतीच्या पाच दिवसांच्या महाउत्सवाची. कोल्हापूरातल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा होणार असून मंडळ पूरग्रस्तांसाठी मदतही करणार आहे.

मुंबईच्या गणेशोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला गणपती म्हणजे गौड सारस्वत ब्राम्हण सेवा मंडळ म्हणजेच ‘जीएसबी गणपती’. GSBचं नाव घेतलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ती बाप्पांची अलंकारांनी सजलेली आखीव-रेखीव भव्य मूर्ती. बाप्पांच्या अंगावरचे दागिने पाहिले म्हणजे भाविकांचे डोळे दिपून जातात. गेली सहा दशकं याच भव्यपणे GSB गणेशोत्सव साजरा करतं आहे.

इतर बातम्या - बारामतीतून अजित पवारांना पराभूत करण्यासाठी भाजपचा प्लॅन, ‘या’ मंत्र्याने घेतली पहिली बैठक

‘नेटकं’ काम आणि नेमकं ‘नियोजन’

GSB सेवा मंडळाचं सर्वच काम अत्यंत नेटकं, काटेकोर आणि आखीव रेखीव. सर्व कामांच डिजिटलायझेशन झाल्यानं कामं वेळेत आणि नमकेपणानं होतात. मंडळाच्या कामाचा हा व्याप पाहिला तरी थक्क व्हायला होतं. मात्र योग्य व्यवस्थापनाच्या बळावर आम्ही हा उत्सव यशस्वीपणे पार पाडतो असं मंडळाचे विश्वस्त आर. जी. भट यांनी सांगतलं. काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव, कामाची भली मोठी यादी, प्रत्येक गोष्ट उत्कृष्टच झाली पाहिजे यावर असलेला भर असं असतानाही भट यांच्या बोलण्यात कुठेही दडपण जाणवत नव्हतं की ताण.

इतर बातम्या - ..म्हणून प्लॅस्टिकच्या बाटलीपेक्षा नेहमी काचेच्या बाटलीत पाणी प्यावं

दडपण जाणवत नाही कारण आम्ही कामाची वाटणीच अशी करतो की कामं विभागली जातात आणि नेमून दिलेलं काम प्रत्येक जण चोखपणे पार पाडतो. त्यामुळं आम्हाला कधीच अडचण येत नाही. काम नाही तर सेवा करणारे समर्पित कार्यकर्ते असल्यावर काळजी करण्याचं काहीच कारण नाही असं सांगत आर.जी.भट यांनी कार्यकर्त्यांवर असलेला विश्वासही व्यक्त केला.

VIDEO: वॉशिंग मशीन आणि निरमाच्या भाजप कनेक्शनवर रावसाहेब दानवे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या