Home /News /maharashtra /

'बाळासाहेब हे हिंदुहृदयसम्राट, भारतरत्न दिल्याने ते मोठे होणार नाही' - छगन भुजबळ

'बाळासाहेब हे हिंदुहृदयसम्राट, भारतरत्न दिल्याने ते मोठे होणार नाही' - छगन भुजबळ

'आजकाल भारतरत्न हे प्रसादासारखे वाटले जातात. ते सगळे पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो, महात्मा पदावर असलेल्या लोकांना खाली आणण्यात काय उपयोग आहे'

'आजकाल भारतरत्न हे प्रसादासारखे वाटले जातात. ते सगळे पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो, महात्मा पदावर असलेल्या लोकांना खाली आणण्यात काय उपयोग आहे'

'आजकाल भारतरत्न हे प्रसादासारखे वाटले जातात. ते सगळे पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो, महात्मा पदावर असलेल्या लोकांना खाली आणण्यात काय उपयोग आहे'

येवला, 23 जानेवारी : ' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) हे हिंदुहृदयसम्राट आहे त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला ते मोठे होणार नाही आणि नाही दिला तर छोटे होणार नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न ( Bharat Ratna) देण्याच्या मागणीवरून नकार दर्शवला आहे. विश्व हिंदू जनसत्ता पार्टीने  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. आज एका कार्यक्रमासाठी दादा भुसे आणि छगन भुजबळ येवल्यात आले होते. यावेळी बाळासाहेब यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे, याबद्दल दादा भुसे आणि भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. 'बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिल्यामुळे ते लहान होणार किंवा मोठे होणार नाही. बाळासाहेब हे हिंदुहृदयसम्राट म्हणूनच मोठे होणार आहे. माझा हाच विचार महात्मा ज्योतीराव फुले यांच्याबद्दल आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांना भारतरत्न देऊन ते मोठे होणार नाही. ते महात्माच आहे. महात्मा गांधी यांना भारतरत्न देऊन काही होणार नाही. मुळात ते महात्माच आहे. बाळासाहेब  ठाकरे हे हिंदुह्रदयसम्राट आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. (अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या बोर्डवर 'चोर है' उल्लेख, मराठी भाषेसाठी काँग्रेस आक्रमक) 'हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जगभरात मोठे आहे. आज किती जणांना भारतरत्न माहिती आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर झाले त्यानंतर काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर यांनाही भारतरत्न दिला. पण, बाळासाहेब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट म्हणून जगभरात ओळखले जातात. गांधी हे महात्मा म्हणून जगभरात ओळखले जातात, हीच त्यांची ओळख आहे, असंही भुजबळ म्हणाले. तसंच, 'आजकाल भारतरत्न हे प्रसादासारखे वाटले जातात. ते सगळे पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतो, महात्मा पदावर असलेल्या लोकांना खाली आणण्यात काय उपयोग आहे' अशी टीकाही भुजबळांनी केली. (Jio युजर्सला लवकरच मिळणार 5G सुविधा, वाचा काय आहे प्लॅन) तर, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे, ती योग्य आहे. भारतरत्नपदाला शोभणारी मागणी आहे. बाळासाहेबांनी शुन्यातून शिवसेनेला मोठं उभं केलं आहे. त्यामुळे या मागणीला मी समर्थन देतो, असं दादा भुसे म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या