पीकविमा मुदतवाढीच्या घोषणेचा फज्जा

पीकविमा मुदतवाढीच्या घोषणेचा फज्जा

पीक विम्याला मुदतवाढ देण्याऱ्या सरकारची घोषणा म्हणजे फुसका बार ठरलाय. पीक विम्याचे आदेश बँकांपर्यंत गेले नसल्यानं शेतकऱ्याला बँकेतून रिकाम्या हातानं परतावं लागतंय.

  • Share this:

01 आॅगस्ट : पीक विम्याला मुदतवाढ देण्याऱ्या सरकारची घोषणा म्हणजे फुसका बार ठरलाय. पीक विम्याचे आदेश बँकांपर्यंत गेले नसल्यानं शेतकऱ्याला बँकेतून रिकाम्या हातानं परतावं लागतंय.

सरकारनं पीक विम्याची मुदत वाढवण्याची घोषणा केली. घोषणा करुनही बँकांचे कांऊंटर रिकामे दिसतायेत. याला कारणही तसंच आहे. सरकारने पीक विम्याला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. पण त्याचे आदेशच बँकांना मिळाले नाहीत.

काल सरकारनं केलेल्या घोषणेनंतर शेतकरी जवळच्या बँकांमध्ये जात होते. पण बँकांचे कर्मचारी आदेश मिळाले नसल्याचे सांगत त्यांना परत पाठवत होते. पीक विमा काढण्यासाठी बँकेत हेलपाटे मारून मारुन शेतकऱ्यांचा फुटबॉल झालाय.

सरकारनं एखादी घोषणा करणं आणि त्याची अंमलबजावणी न होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दहा हजारांची उचल देण्याची सरकारने घोषणा केली. पण ते दहा हजार काही सगळ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आता तोच अनुभव पुन्हा येतोय. घोषणा करणं आणि त्याची अंमलबजाणी करण्यात चालढकल करणं यामुळे सरकारच्या विश्वासहर्तेला धक्का लागण्याची शक्यता आहे.

First published: August 1, 2017, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading