आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची नियुक्ती नाहीच

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची नियुक्ती नाहीच

मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सध्या मराठा तरुणांची नियुक्ती करता येणार नाही

  • Share this:

मुंबई, 3 मार्च : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयातून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय घेता येणार नाही, असं महत्त्वपूर्ण विधान बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत केलं आहे. गेल्या 36 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांचं आंदोलन सुरु आहे.

भाजप आमदार भाई गिरकर यांनी मराठा आरक्षणासाठी तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना हे विधान केलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मराठा आंदोलनाचा विषय़ सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून त्या संदर्भात आदेश येत नाही तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय़ घेता येणार नाही. मराठा समाजातील तरुण राज्य शासनाच्या वेगवेगळ्या 56 हून अधिक रिक्त जागांवर नियुक्ती करावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. 62 मधील कलम 18 अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून 2014 सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची तत्काळ नियुक्ती करावी यासाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या 36 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत.

संबंधित -UPSC ची तयारी करणारे मराठा तरुण अडचणीत

काही दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली होती. हे सरकार अधिकारी चालवतात की मुख्यमंत्री चालवतात हा प्रश्न पडला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. या मराठा तरुणांना न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी दिला होता. मराठा समाजाला बाजूला ठेवू नका. 35 दिवस आंदोलन करुनही का पर्याय निघाला नाही, सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचं असतं अधिकाऱ्यांनी नाही. अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीमुळे साडेतीन हजार तरुणांचं भवितव्य धोक्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले होते.

संबंधित - Maratha Reservation : नोकरी द्या, नाहीतर आत्मदहन करणार; तरुणांचा पुन्हा एल्गार

First published: March 3, 2020, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading