कोरोनाच्या लढाईत अजूनही आहेत अडचणी, सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या नेत्यानेच मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

कोरोनाच्या लढाईत अजूनही आहेत अडचणी, सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या नेत्यानेच मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

महाविकास आघाडी सरकारमधील एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

विनया देशपांडे, मुंबई, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य सरकार आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असतानाही राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. यामुळे विरोधी पक्षाकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात माहे. मात्र अशातच आता महाविकास आघाडी सरकारमधील एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित उद्धव ठाकरे यांचं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या कामाबाबत अभिनंदन केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या मतदारसंघात कोरोनाविरुद्ध लढाई लढताना येत असलेल्या अडचणींबाबत चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

वैद्यकीय, कृषी अर्थव्यवस्था, कोरोना साथीची अधिकृत माहिती, लॉकडाऊन आणि स्वस्त धान्य दुकान याबाबत लोकांना येत असलेल्या अडचणींबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. तसंच या अडचणी सोडवण्यासाठी काय करता येऊ शकतं, याबाबतचा सल्लाही चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

विश्वजीत कदम यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलं आहे पत्र

खेराडे वांगीतील मृत व्यक्तीवर 19 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार होते. मात्र मृत व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे हे रुग्णालय प्रशासनाकडून 22 एप्रिल रोजी सांगण्यात आले. ही माहिती समोर आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. याला सायन हॉस्पिटल जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

मुंबईत मरण पावलेल्या खेराडे वांगीतील व्यक्तीची स्वॅब टेस्ट घेऊन देखील त्याचे पार्थिव बाहेर कसे काय काढू दिले? असा प्रश्न करत याप्रकरणी सायन हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी करा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे पत्रातून केली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 24, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या