• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'सरकार चालवत असताना काही अडचणी येत असतात, पण...', शरद पवारांचं महत्त्वाचं विधान

'सरकार चालवत असताना काही अडचणी येत असतात, पण...', शरद पवारांचं महत्त्वाचं विधान

'महाविकास आघाडी सरकार (mva government) स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्यावेळी...'

  • Share this:
बारामती, 27 जून:  'सरकार (MVA Government) चालवत असताना अडचणी येत असतात. त्यामुळे कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी तिन्ही पक्षाचे सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही' असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे भाजप शिवसेना युतीची चर्चा रंगली होती. या मुद्यावर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर चमकला, वेस्ट इंडिजनं केली दक्षिण आफ्रिकेची धुलाई 'महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्यावेळी कॉमन मिनीमम कार्यक्रम तयार करण्यात आला होता. सरकार चालवत असताना काही ना काही अडचणी येत असतात. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे समन्वय साधण्याचं काम करतात. सरकारमध्ये काही अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय हे सहा जण घेत असतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही' असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं. सरकारी टेंडर आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवत अनेकांची फसवणूक, गँगचा पर्दाफाश 'आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी यात काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार असून याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही' असंही पवार म्हणाले. आरबीआयने नवीन आदेश दिले असून आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आता सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळणार नाही, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, 'RBI ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. त्यामुळे  धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल.'
Published by:sachin Salve
First published: