...मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं? भुजबळांचा पाटलांना सणसणीत टोला

...मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं? भुजबळांचा पाटलांना सणसणीत टोला

'हिंमत असेल तर कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल, असं आव्हानच चंद्रकांत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. त्यावर...'

  • Share this:

नाशिक, 03 नोव्हेंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोल्हापूर निवडणुकीच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. 'जर कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचा अधिकार का डावलला, विधानसभेला त्यांचं तिकीट का कापलं', असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) यांनी लगावला आहे.

नाशिकमध्ये आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी चौफेर फटकेबाजी केली.

खडसेंकडून आता महाजनांच्या गडाला सुरुंग, 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, 'हिंमत असेल तर कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल.' त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत  'जर कोल्हापूरमधून निवडून येणार होता तर पुण्यात मेधा कुलकर्णी यांचं तिकीट का कापलं? असा सणसणीत टोला भुजबळांनी लगावला.

तसंच, या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि राज्यपालांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली.

‘मेट्रोशेड’च्या वादावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

'राज्यपाल यांनी वारंवार नाशिकला यावं, हवा आणि निसर्ग चांगला आहे. राज्यपालांनी नाशिकला राजभवन बांधावं.  या 2 वर्षात सर्व इमारती बांधा,  राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन जाऊ देऊ' असा टोमणा भुजबळांनी राज्यपालांना लगावला. यावर 'तब तक क्या सिन रहेंगा? अशी कोपरखळी राज्यपालांनी लगावली.

आता राज्यपालांनी कोपरखळी लगावल्यावर  'हम तब भी आपके साथ ही रहेंगे' असं म्हणत भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आणि सभागृहात एकच हश्या पिकली.

हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना टोला

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याच्या आव्हानावर तिरकस प्रतिक्रिया दिली.

दात तुटेपर्यंत भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

'कोल्हापूरमध्ये हरलो तर हिमालयात जाईल, असं पाटील म्हणत असले तरी आम्ही अशी कोणतीही टीका केली नाही. मुळात ज्यात काही तथ्य नाही. त्यात असं बोलणं योग्य नाही. चंद्रकांतदादा, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही कुठे ही जावू नका, असा खोचक टोला मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Published by: sachin Salve
First published: November 3, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या