Home /News /maharashtra /

...मग अजित पवारांवर गुन्हा दाखल का नाही? गोपीचंद पडळकरांचा सवाल

...मग अजित पवारांवर गुन्हा दाखल का नाही? गोपीचंद पडळकरांचा सवाल

Gopichand Padalkar vs NCP: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघर्ष वाढत चालला असल्याचं दिसत आहे.

जालना, 1 जुलै: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padlkar) हे बुधवारी सोलापूर (Solapur) येथे एका बैठकीला पोहोचले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सायंकाळी 5 नंतर संचारबंदी तसेच जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे असे असताना पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाबाबत बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गोपीचंद पडळकर यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल होताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, काल माझ्यासोबत 20 लोक असतांना 29 जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाला 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते, मग अजित पवारांवर (Ajit Pawar) का गुन्हा दाखल केला नाही. गोपीचंद पडळकर जालन्यात एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन इसमांनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे. बुधवारी पडळकरांच्या गाडीवर हल्ला भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड भिरकावला. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Gopichand padalkar, NCP

पुढील बातम्या