Home /News /maharashtra /

...तर राज्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

...तर राज्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

जिल्ह्यात आता शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावती, 14 फेब्रुवारी : महाराष्ट्रावर (Maharashtra) आलेले कोरोनाचे (Corona) संकट ओसरले असले तरी भीती मात्र कायम आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंतेच वातावरण आहे. अमरावतीमध्ये (Amravti) 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जर रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती जिल्ह्यात 1 फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 432 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी 369 तर शनिवारी 376 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश काढले आहे. Trump Impeachment: डोनाल्ड ट्रम्प यांना सिनेटकडून दिलासा, हिंसा भडकवल्याचा आरोप यानुसार जिल्ह्यात आता शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले तर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास व कोरोना त्रिसुत्रीचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. सावधान; वृद्ध पालकांचा योग्य सांभाळ करताय ना! नाहीतर वेतनात होणार मोठी कपात शहरातील मार्केट, बाजारपेठा दुकाने यांना मात्र यातून सूट दिलेली असून शासनाच्या नियामवलीचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा वासियांनी आता जर कोरोनाचा धोका गांभीर्याने घेतला नाही तर येणाऱ्या काळात लॉकडाऊनचा  सामना करावा लागेल अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या