'तेव्हा मुख्यमंत्रिपद एका ब्राह्मणाला दान केले', खडसेंचा फडणवीसांना टोला

'तेव्हा मुख्यमंत्रिपद एका ब्राह्मणाला दान केले', खडसेंचा फडणवीसांना टोला

'एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्या नेत्याला बाजूला टाकण्यात आले. आज त्याच व्यक्तीमुळे भाजप सरकारचे वाटोळं झालं आहे'

  • Share this:

जळगाव, 09 :  माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला (BJP)रामराम ठोकून राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीकेची एकही संधी सोडली नाही. 'तेव्हा आपण मुख्यमंत्रिपद हे एका ब्राह्मणाला दान केले', असं म्हणत खडसेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ खडसे यांनी हे विधान केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी  मुख्यमंत्रिपदावरून  भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होते. पण 'हा नाथाभाऊ दिलदार आहे. त्यावेळी नाथाभाऊ तुम्ही घरी बसा, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं सांगण्यात आलं होतं. मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान देण्यात हरकत काय आहे', असं वक्तव्य खडसे यांनी केलं.

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा, सेनेचा मोदींना टोला

तसंच, 'एका व्यक्तीच्या लाडापोटी  माझ्यासारख्या नेत्याला बाजूला टाकण्यात आले. आज त्याच व्यक्तीमुळे भाजप सरकारचे वाटोळं झालं आहे, अशा लोकांमुळे मला भाजप पक्ष सोडावा लागला, असंही खडसे म्हणाले.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये निवड न झाल्यामुळे एकनाथ खडसे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भाजप सोडण्यासाठी खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरले आहे.

मुलाने app डाउनलोड करणं पडलं भारी, वडिलांच्या खात्यामधून झाली 9 लाखांची चोरी

'भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा आरोप खडसेंनी पक्ष सोडताना केला होता.

Published by: sachin Salve
First published: November 9, 2020, 10:59 AM IST

ताज्या बातम्या